Whose Shiv Sena? The hearing will be held before the Election Commission on December 12 नवी दिल्ली : राज्यातील शिवसेनेच्या दोन गटात शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची? याबाबत न्यायालयीन लढा सुरू आहे. शिवसेना नेमकी कुणाची याबाबत आता पुढील निर्णय डिसेंबरच्या 12 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे होणार आहे.
दोन्ही गटाचा शिवसेनेवर
बंडखोरीनंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहित आम्हीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केला तर उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यापासून रोखावे, अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील वादावर येत्या 12 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या आधी आयोगाने दोन्ही गटांना पक्ष तसेच पक्ष चिन्हावर दावा सांगण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्यासही मुदतवाढ दिली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेनेचे गोठवले चिन्ह
दोन्ही गटांना येत्या 9 डिसेंबरपर्यंत निवडणूक आयोगाकडे ही कागदपत्रे जमा करता येणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या 8 तारखेला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला मात्र कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही पक्षांना नावं आणि चिन्ह देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.