शिवसेना कोठेही जाणार नाही आमच्यासोबतच राहील-फडणवीस

0

नवी दिल्ली- महाराष्ट्रात चार वर्षापासून युती सरकार आहे. पहिल्यापासून दोघांमाध्ये बेबनाव आहे. मात्र आघामी काळात देखील शिवसेने सोबत युती होईल. शिवसेना आज जरी काहीही म्हणत असेल परंतू शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील कुठेही जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सामनामधील अग्रलेखांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. सामनातले अग्रलेख वाचले तर वाटते की युती होणे अशक्य आहे यावर तुम्ही काय म्हणाल असे विचारताच, अहो म्हणूनच मी सामना वाचत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच राज्यांमधील निवडणुकांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी या निवडणुकांच्या निकालांवरून लोकसभेचा अंदाज बांधू नका लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राहुल गांधी विरोधकांचे नेतृत्त्व करत आहेत हे चांगलं आहे, पुढची दहा वर्षे तरी त्यांना विरोधातच बसायचे आहे असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत.