शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला !

0

उस्मानाबाद: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उस्मानाबादमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर तरुणाने चाकू हल्ला केला आहे. कळंब तालुक्यात प्रचारसभा सुरु असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नायगाव पाडोळी या गावात ही घटना घडली आहे.

या हल्ल्यातून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्याच बचावले आहेत. पोटावरचा वार हातावर झेलल्याने ओमराजे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे.