पिंपरी । भाजप-शिवसेना मित्र पक्ष नावालाच आहेत. महापालिकेच्या विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजने होताना गटनेत्यांची आठवण कोणाला होत नाही. भाजप-शिवसेनेची राज्यात युती असेल. इथे कसली युती, ‘घंटा’, अशा शब्दांत शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (दि.7) व्यक्त केली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एका प्रस्तावावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी महासभेसमोर प्रस्ताव आणण्यापूर्वी गटनेत्यांना विश्वासात घेण्याची सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रशासनाला केली. त्याचा धागा पकडून शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी थेट भाजप-शिवसेना युतीवर भाष्य केले. महापालिकेत विरोधी पक्षांचे गटनेते आहेत. याबाबत भाजपला अठरा महिन्यानंतर साक्षात्कार झाला आहे. हे आश्चर्य असल्याचा टोला, त्यांनी भाषणातून लगावला. त्याबरोबर महापालिकेच्या विकास कामांची उद्घाटने होताना गटनेत्यांची आठवण होत नाही. महापालिकेत आम्हाला कोणीही विचारत नाहीत, अशी खदखद कलाटे यांनी व्यक्त केली. तर, प्रस्ताव तहकूब करून सत्ताधार्यांनी मांडवली करून पुन्हा तो मंजुरीसाठी आणू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
हे देखील वाचा