शिवसेना नेते एकनाथ शिंदे अजित पवारांच्या भेटीला !

0

मुंबई: शनिवारी २३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे प्रकरण संपूर्ण देशासाठी धक्कादायक होते. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पक्षविरोधी असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन नसल्याचे सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र असून भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अजित पवारांची मनधरणी सुरु आहे. आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवारांच्या भेटीला गेले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार असून अजित पवारांची मनधरणी करणार आहे. दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने अजित पवारांची भेट घेऊन मनधरणीचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

शपथविधीनंतर राज्यपालांनी भाजपला ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. मात्र तातडीने विश्वासदर्शक ठराव व्हावे यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत भाजपला तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. दरम्यान काल आणि आज सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखीव ठेवला असून उद्या सकाळी १०.३० वाजता याबाबत निकाल देणार आहे. त्यामुळे आज देखील भाजपला दिलासा मिळाला आहे.