शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात रक्तदान शिबिर

0

रक्तदान काळाची गरज -ललितकुमार मुथा

भुसावळ- क्रांती दिवस तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेल कामगार सेना भुसावळ मंडल तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन रेल्वे दवाखान्यात करण्यात आले. रक्तदान ही काळाची गरज असून या महान कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी प्रसंगी केले. प्रसंगी 55 दात्यांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआरएम आर.के.यादव होते. सीएमएस जॉर्ज थॉमस, एसीएमएस डॉ.श्रवणकुमार, डॉ.चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास राजेश लखोटे, प्रदीप भुसारे, रामदास आवटे, विनोद वाघ, प्रीतम टाक, नरेश शर्मा, योगेश माळी, कमलाकर बाणाईत, राकेश पाठक, एम.के.शाह, संदीप जावळे, भीमराव राठोड, नितीन खंडारे, नीलेश गेडाम, पी.एन.करसाळे, विजय तायडे, राजेश गोडबोले, आर.के.बोकाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.