सोयगांव। शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान नावाची योजना जाहीर करुन शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. किती शेतकर्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरला? तसेच अर्ज करतांना काही अडचणी येत आहेत का? याची माहिती शिवसेनेतर्फे मागितली जात आहे.
त्यानुसार सोयगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी महा-ई-सेवा केंद्रात जाऊन माहिती जाणुन घेतली. यावेळी उपनगराध्यक्षय योगेश पाटील, नगरसेवक भगवान इंगळे, दिलीप मचे, शहर प्रमुख गजानन चौधरी, चांद्रास रोकडे, विनोद मिसाळ, राजेश सोनवणे, एकनाथ महाजन, संतोष बोडखे, रवींद्र काटोले , प्रभाकर नागपुरे आदी उपस्थित होते.