मुंबई : शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळायलाच हवी त्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे या मागणीवरून रान उठवणा-या शिवसेनेची भूमिका मवाळ झाल्याने हे आंदोलनही फेल ठरल्याने शिवसेना बॅकफूटवर गेली आहे तर भाजपची सरशी झाल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात उमटली आहे.
केंद्रात आणि राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही भाजपला डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नोटबंदीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं. तर महापालिकेच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची जुगलबंदीही रंगली हेाती. शेतक-यांना कर्जमाफी मिळावी पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले असतानाच शिवसेनेनेही कर्जमाफीच्या बाजूने भूमिका घेतल्याने सरकारची कोंडी झाली हेाती. जेापर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका असे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदारांना दिले हेाते अशी माहिती शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच दिली होती. मात्र उत्तरप्रदेशच्या निवडणुक निकालानंतर शिवसेनेची भूमिका मवाळ झाली आहे. शिवसेनेचे काही मंत्री मुख्यमंत्रयाशी संधान साधून आहेत. शिवसेनेच्या मवाळ भूमिकेचा फायदा उठवण्यासाठी दिल्लीवारीचा बेत आखण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाला घेऊन दिल्लीत गेले. पंतप्रधानांनी भेट नाकारली त्यामुळे केंद्रीय मंत्रयाशी चर्चा घडवून आणण्यात आली. मी स्वत: उध्दव ठाकरे यांना फोन केल्याचेही मुख्यमंत्रयानी सांगितले होते. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेची आक्रमकता कमी करण्यात मुख्यमंत्रयांना यश आलं. आणि अर्थसंकल्प मांडून मंजुरही करून घेतला. दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या मंत्रयानी राजीनामा खिशात घेऊन फिरतो असे सांगीत सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी होती. मात्र त्यानंतर शिवसेनेचे मंत्री भाजपबरोबर मांडीला मांडी लावून काम करीत आहेत. सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी असो वा शेतक-यांच्या कर्जमाफीची मागणी शिवसेनेच्या दोन्ही भूमिका फसल्याने शिवसैनिकातच नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाही. शिवसेना आजही आक्रमक आहे. इतरांबरोबर आम्ही आंदोलनात उतरलो. पण कृती स्वरूपात यायला पाहिजे त्या गोष्टी शिवसेनेने केल्या. त्यासाठी मुख्यमंत्रयानी हमी दिली. शिष्टमंडळाने जाऊन केंद्राची भेट घेतली या गोष्टी शेतक-यांच्या भावनेतून केल्या आहेत. शेतक-यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत शिवसेना त्याचा पाठपुरावा करणार आहे. शिवसेना शेवटपर्यंत शेतक- यांच्या बाजूने आहेत.
– अनिल देसाई, खासदार शिवसेना