अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत दावा
हे देखील वाचा
मुंबई:- भाजपा-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाद सुरु असताना आणि पुढच्या निवडणुका वेगवेगळ्या लढविणार असे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर आता राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काहीही झाले तरी शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढविणार असल्याचा दावा विधानसभेत केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढविणार असल्याचे ठामपणे सांगितले. शिवसेना-भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरु झाले असून भविष्यात आमच्या काळातच त्या पूर्ण झालेल्या स्मारकाचे उदघाटन होईल असे मुनगंटीवार म्हटले असता विरोधी पक्षाकडून शिवसेना सोबत असेल का? असा प्रश्न केला. त्यावरमुनगंटीवार यांनी शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढविणार असल्याचा दावा केला. सामना वाचून वाचून तुमचा गैरसमज होतोय, असा टोमणाही यावेळी त्यांनी मारला. कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाल्यानी १९९९ मध्येअसेच चित्र दाखविले होते आणि एकत्र लढले. आताही तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही एकत्र आले. मागच्या वेळी तुम्ही देखील वेगवेगळे लढले होते. त्यामुळे आम्ही वेगळे होणार नाही तर एकत्रच लढू असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.