शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही: फडणवीसांचा हल्लाबोल

0

मुंबई: कंगना रानौत, अर्णब गोस्वामी यांना पाठींबा दिल्याने भाजप महाराष्ट्रद्रोही आहे असे आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारशी भांडणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह आहे का?, तसेच कोणाच्या सांगण्याने महाराष्ट्रद्रोही होत नाही. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र होत नाही, ही गोष्ट शिवसेना नेत्यांनी कायम लक्षात ठेवावी असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरक्षणाबाबत सरकारची वेळकाढू भूमिका
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाहीये. सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात अपयशी ठरत आहे. आरक्षणाबाबत सरकारची वेळकाढू भूमिका असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळात राज्य सरकारने भ्रष्ट्राचार केला असून विरोधी पक्ष गप्प बसणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.