शिवसेना-युवासेनेतर्फे भगवा चौकात दहीहांडी

0

धुळे । शहरातील भगवा चौक येथील शिवसेना -युवासेनेतर्फे दहीहंडी उत्सव जलोषात साजरा करण्यात आला. काकासाहेब बर्वे वसतिगृहाचे विद्यार्थींनी तीन थर लावून दहीहंडी फोडली.

यंदाच्या पाचवे वर्षे होते. काकासाहेब बर्वे वसतिगृहाचे विद्यार्थींनीच्या पथकाला एकूण 5001 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, डॉ .माधुरी बाफना,आझादनगर पोलीस निरिक्षक पवार , अ‍ॅड.पंकज गोरे, सुहास शिर्के, प्रवीण मूर्तडक, दीपक गोरे, कैलास मराठे, सागर गोरे, भटु शेट्ये, निलेश चौधरी, सोनवणे उपस्थित होते.