मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : भाजपाला सोडचिट्टी देत माजी सरपंच सेनेत
मुक्ताईनगर- नगरपंचायतीसाठी चांगलेच निवडणूक वातावरण तापले असून मंगळवारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने प्रचाराचा शुभारंभ हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून व प्रवर्तन चौकात महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच जुने गावातील सिनेमा टाकीच्या मागील दर्गाहवर चादर चढवून करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, अनंतराव देशमुख, ईश्वर राहणे, अविनाश बोरसे, संतोष बोदडे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अॅड. मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल पाटील, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, शहरप्रमुख प्रशांत भालशंकर, राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, रामभाऊ पुनासे, प्रशांत टोंगे, हारून मेंबर, मुशीर मनियार, सुपडू खाटीक, कलिम मनियार, जफर अली नजीर अली, कमर दाऊद, बिस्मिल्ला ठेकेदार, जहीर भाई, यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक, कार्यकर्ते व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
मुक्ताईनगर भाजपाला खिंडा
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असता शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपचे माजी उपसरपंच रामदास पुनासे (कुंभार) व भाजपचे माजी उपसरपंच जफर अली नजीर अली यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. भाजपातून शिवसेनेत आलेल्या जफर अली नजीर अली व सोनाली योगेश पुनासे यांना शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार घोषित केले. भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या भाजपचे माजी सरपंच रामभाऊ पुनासे याच्ंया स्नुषा सोनाली योगेश पुनासे यांना प्रभाग क्रमांक 13 मधून व जफर अली नजीर अली यांना प्रभाग क्रमांक 11 शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. त्याबाबत सेनेने प्रसिद्धी पत्रकही काढले आहे.