मुंबई । ज्यांच्यावर शेतकर्यांनी विश्वास टाकून सत्ता दिली , त्यांनीच शेतकर्यांची निराशा केली आहे . त्याचाच परिणाम म्हणून आज शेतकर्यांचा उद्रेक झाला असल्याची टिका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्हे यांनी केली आहे . सरकारला ’ ग बाधा झाली असल्याचे त्यांनी सांगितले . शेतकर्यांच्या प्रश्नावर शिवसेना शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले . शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार कमी पडले आहे असेही गोर्हे म्हणाल्या .
भाजप नेते शेतकर्यांसंदर्भात वजातव्य करत आहेत . तसेच भाजप प्रवकती त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नाशी संबंधित स्वामिनाथन आयोग आम्ही लागू करू असे आश्वासन कधीच दिले नसल्याचे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले होते .याशिवाय शेतकर्यांचा संप झालाच तर ऍन धान्य आयात करता येऊ शकते असे वक्तव्य करून बीहाणदारी यांनी शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार केला आहे . त्यामुळेच शेतकर्यांचा उद्रेक झाला आहे . सरकारने शेतकर्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून कर्जमाफीचा निर्णय घ्यावा .तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील व्यापारी संबंधांवर लक्ष ठेवावे .जे व्यापारी उद्भवलेली संधी पाहून मालाची साठवणूक करतील त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी असेही नीलम गोरे यांनी म्हटले आहे .
राज्यभरात शेतकरी संपाचा परिणाम दिसत असून शेतकरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उताराला आहे. या शेतकर्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असून सरकारने याची त्वरित दाखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे .