राज्यसभा निवडणूक : उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना शिवसेनेकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.
23 तारखेला मतदान व मतमोजणी
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. शिवसेनेचे नाव निश्चित झाल्यानंतर आता भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे आहे. एप्रिल-मे 2018 मध्ये राज्यसभेतून निवृत्त होणार्या खासदारांच्या जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.