शिवसेनेकडून शेतकर्‍यांना 2 कोटींची मदत

0

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी राज्य आणि शहरातून अनेक शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये आले होते. याचबरोबर, स्मृतिदिनाचे औचित्य साधत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्त केले. यासंदर्भात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली.