शिवसेनेचा जिल्ह्यात भगवा सप्ताह

0

जळगाव। जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यान सहानभूती निर्माण करण्यासाठी भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवार 13 रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार 30 मे ते 5 जून पर्यत भगवा सप्ताह साजरा होणार आहे. कार्यकर्ते आणि शिवसेना यामधला ताळमेळ कायम ठेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍याच्या समस्या जाणून सरकार दरबारी त्याचा पाढा वाचण्यात येणार आहे. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस ,गारपीठ अशा विविध समस्या शेतकर्‍याच्या आहे.यामुळे जिल्ह्यातील त्र्तेक तालुक्यात आणि गावात जाऊन शेतकर्‍याच्या भेटी घेण्यात येणार आहे.

भगव्या सप्ताहात कार्यक्रमाचे आयोजन
शेतकर्‍यांची कर्ज मुक्तीसाठी आंदोलन, रस्ता रोको, मोर्चा, निवेदन, शेतकर्यांचा किवा शिवसेनेचा मेळावा, लोडशेडींग बंद होण्यासाठी आंदोलन किंवा निवेदन, शेतकर्यांचा कर्ज पुरवठा बँक (एटीएम) खात्यातील अडचणी सोडविणे तसेच आंदोलन करून निवेदन देणे, विविध निवडणुकीच्या आचारसंहितंमुळे काढलेले शिवसेना शाखेचे बोर्ड लावण्याची मोहिम सुरू करणे, गाव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक यांचे नुतनीकरण करणे, प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या रिक्त पदाची नावे जाहिर करावयाचे, तालुक्यातील शेतकरी आत्महत्त्या कुटूंबाचे सांत्वन करून मदत व सहकार्य करणे, प्रत्येक शेतकर्याला मासिक रूपये 3000/- वेतन मिळावे. या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन , प्रत्येक महिन्याला 45 दिवसात संजय निराधार योजनेची मिटींग घेण्यास भाग पाउून गरजू लोकांचे प्रकरण शिवसैनिकांमार्फत सादर करावे, पिवळे काडे धारक विंधवा महिलेस तहसिलदार यांचेकडून रूपये 20,000/- मदत मिळवून द्यावी. असे विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाप्रमुख गुलाब वाघ यांनी दिले आहे.

शेतकर्‍यांच्या सहानभूतीसाठी भगवा सप्ताह
ग्रामीण भागात जाऊन कर्जात होरपळेल्या शेतकर्‍याच्या व्यथा आणि दु:ख पाणी टंचाई, जलयुक्त व जलसंधारणा कामे ,दुष्काळावर मात आणि उपाय योजना करणे. मदत आणि सहकार्य करण्यासाठी सेनेतर्फे भगवा सप्ताहाच्या माध्यमातून शिवसैनिक जिल्ह्याचा दौरा करण्यात येणार आहे. शेतकर्‍याचे व जनसामान्याचे कामे झाल्यास येणार्‍या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात सेना विविध उपक्रम राबवून मतदारांच्या हिताचे बोलन करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. येणार्‍या काळात पक्ष बांधणीसाठी कामाला सुरुवात केली अशी माहिती जिल्हाप्रमुख वाघ यांनी दिली आहे.

सहकार मंत्र्यांच्या वाढदिवशी सांगता
भगवा सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी कोणत्याही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. नियोजन बद्ध आयोजन तालुका तसेच ग्रामीण भागात करण्यात यावे. कार्यक्रमाची शेतकर्‍यान आगोदर माहीती देण्यात यावी, याबाबत जिल्हाप्रमुख वाघ आणि संपर्कप्रमुख मिर्लेकर यांना कळवावे. भगवा सप्ताहाची सुरवात 30 मे ला राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीपासून जिल्ह्यातील तालुक्यात सुरूवात होणार असून 5 जून ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसशी संध्याकाळी 5 वा. पाळधी येथे भगव्या सप्ताहाची सांगता होणार आहे.