शिवसेनेचा महावितरण कंपनीवर मोर्चा

0

रावेर – तालुक्यातील शेतकर्‍यांना रिडिंगप्रमाणे बिल देण्यात यावे अव्वाच्या सव्वा बिल रद्द करा, यासह अनेक मागण्यांसाठी उपविभाग महावितरण कंपनीवर शुक्रवार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून सुटले होते. याबाबत वृत्त असे की, छोरिया मार्केट येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, युवा जिल्हाप्रमुख अविनाश पाटील उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगराज पाटील, अशोक पाटील, माजी शहराध्यक्ष संतोष महाजन, अशोक शिंदे, तुकाराम कोळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.