मुंबई- देशात इंधनाच्या दरात होत असलेली भरमसाठ वाढ यामुळे सरकारला विरोधकांसह सामान्य जनतेचा रोषाचा सामना करावा लागतो आहे. राज्यात सत्तेतील सहभागी पक्ष शिवसेना देखील नेहमीच सरकारवर टीका करीत असतो. सरकारविरोधात आंदोलने देखील करतो, मात्र शिवसेनेची ही सगळी आंदोलने ढोंगी असल्याचे आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
शिवसेनेची ही अशी सर्व आंदोलने म्हणजे ढोंग आहेत. त्यांना खरोखरच सर्वसामान्यांची काळजी असेल तर मंत्रिमंडळातील त्यांच्या अर्थराज्यमंत्री यांनी किमान पेट्रोल, डिझेल वरील राज्याचे कर कमी करावेत असा किमान प्रस्ताव तरी आणावा, तरच जनता विश्वास ठेवेल अन्यथा सर्व ढोंगच .. @ShivSena https://t.co/VL0prFg2tX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 8, 2018
शिवसेनेची ही अशी सर्व आंदोलने म्हणजे ढोंग आहेत. त्यांना खरोखरच सर्वसामान्यांची काळजी असेल तर मंत्रिमंडळातील त्यांच्या अर्थराज्यमंत्री यांनी किमान पेट्रोल, डिझेल वरील राज्याचे कर कमी करावेत असा किमान प्रस्ताव तरी आणावा, तरच जनता विश्वास ठेवेल अन्यथा सर्व ढोंगच आहे असे आरोप ट्विटरवरून धनंजय मुंडे यांनी केले आहे.