शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा भुसावळात पुतळा जाळला
वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंदोलनाने शहरात उडाली खळबळ
भुसावळ : देशातील तमाम वंचितांचे श्रद्धास्थान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी हिंगोली येथील सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीदरम्यान एक हजार कोटी रुपये घेतले असल्याचा खोटा आरोप केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी जळगाव जिल्ह्याच्या वतीने भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार संतोष बांगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी सकाळी दहन करण्यात आले. वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रकाश आंबेडकर देशातील एकमेव निष्कलांकित नेते असून शिवसेनेला वंचित वर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. संतोष बांगर यांचे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. जुगारी आमदार अशी त्याची संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात ओळख आहे. त्याला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार म्हणाले. याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका महासचिव प्रल्हाद घारू, विशाल घायतडक, राहुल गवई, दीपक इंगळे, शुभम सोळंके, आकाश वानखेडे, पवन सोनवणे, आकाश जाधव, रोशन तायडे, मनोज साळुंखे, अविनाश गोठले व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.