चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील ग्रामरोजगार मस्टर सादर होवुन पेमेंट मिळत नाही, दलीत वस्ती अंतर्गत झालेल्या कामांचे पेमेंट मिळत नाही तसेच रोजगार हमी च्या बेकायदेशीर सिंचन विहीरींची बेकायदेशीर यादी रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन 1 फेब्रुवारी 2018 रोजी गटविकास अधिकारी यांना शिवसेनेतर्फे देण्यात आले असुन 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत, उपजिल्हा प्रमुख आर.एल.पाटील, उपजिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, भिकन पाटील, प्रकाश वाणी, दिनेश विसपुते, भीमराव खलाणे, संजीव पाटील, पांडुरंग बोराडे, राहुल पाटील, सचिन फुलवारी, प्रभाकर उगले, कैलास गढरी आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्य स्वाक्षर्या आहेत.
निवेदनात या केल्या मागण्या
मागील काळात रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर योजनेचे बेकायदेशीर लाभार्थी निवडले, त्यात भ्रष्टाचार होवून ग्रामीण भागातील शेतकर्यांची फसवणूक झाली व प्रशासकीय मान्यता मिळाल्याची बेकायदेशीर यादी तयार झाली ती रद्द करावी. ग्रामपंचायत स्तरावर होणार्या ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थ्यांची निवड करावी. तसेच तालुक्यातील पंचायत समिती मार्फत बेघरांची कामे, बेघरांची कामे, विहीर पुनर्भरण नाफेड योजनेंतर्गत गांडूळ खत युनिट आदी कामे चालु आहेत ग्रामपंचायती मार्फत ग्रामरोजगार मस्टर सादर होवूनही त्याचे पेमेंट अदा होत नाही, लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व पंचायत समिती ग्रामपंचायत मार्फत ब-याच गावांमध्ये दलीत वस्तींची कामे होवुन देखील ते बिले अदा होत नाहीत. तरी सर्व प्रलंबीत कामे 8 दिवसात पूर्ण करावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.