शिवसेनेचे पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

0

धुळे । शिवसेनेचे साक्री विधानसभा संघटक पंकज ऊर्फ पिंटूदादा मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. धुळे शहरातील अंधशाळेत फळ व खाऊवाटप करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख बाबनराव थोरात, जिल्हा प्रमुख हिलाल माळी,सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे,नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, भटूआप्पा गवळी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वह्यावाटप
दरम्यान, साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जि.प.मराठी शाळेतील गरजू मुलांना फळवाटप व वह्या वाटप करण्यात आले. पोलीस ठाणे साक्री येथे पोलीस निरीक्षक आर.एस.पाटील यांनी पंकज मराठे यांचा सत्कार केला. यावेळी महाविर जैन, दहिवलचे अमोल सोनवणे, देवा सोनवणे, रोहोडचे सरपंच हिंमत साळुंखे, पिंपळनेरचे फत्तू गुरव, उदय बिरारी, नितीन गायकवाड, अंबापुरचे सरपंच सोनू मारनर, काँग्रेसचे पोपटराव सोनवणे, उत्पल नांद्रे, भाजपाचे बबलु देसले, बबलु मराठे, डॉ.देवेंद्र देवरे, योगेश वाणी, योगेश चौधरी, शैलेश अजगे, बापुसाहेब गिते, डॉ.अनिल नांद्रे, नरेंद्र मराठे, प्रसाद देसले, जि.प.सदस्य विजय ठाकरे, बाबा सोनवणे, मलांजनचे सरपंच ऋषिकेश मराठे, आरिफ शेख, शिवसेनेचे विशाल देसले, नितीन गुप्ता हर्षल सोनवणे, शाहरुख खाटकी, डॉ चंद्रकांत शिंदे, बंडू गीते,बाळा शिंदे,अनिल खैरनार गोविंदा सोनवणे, विकी बाबर, धनराज चौधरी, दिपक घुगे, विकी गीते,काल्या पठाण आदी उपस्थित होते.