अमरावती : शिवसेनेचे माजी आमदार तथा अमरावती जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांचे काल रात्री ९च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. संजय बंड यांची दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना छातीचा त्रास वाढला होता.
जिल्ह्यातील वलगाव मतदार संघाचे सन १९९५ ते ९९, १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ अशी सलग १५ वर्षे त्यांनी आमदारकी भूषविली. विद्यार्थी दशेपासून शिवसेनेशी जुळलेल्या बंड यांची मातोश्रीशी जवळीक होती.