शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण यांचे निधन

0

चिंचवड : शिवसेनेचे माजी शहर प्रमुख, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय 57, मोहनगनर, चिंचवड) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

चव्हाण यांनी 1997 ते 2007 दरम्यान नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. तर भगवा रक्षक या साप्ताहिकाचे ते संपादक होते.चव्हाण यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी बोरवडे (ता.कागल जि. कोल्हापूर) येथे अंत्यसंस्कार झाले.