शिवसेनेचे शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी मार्गदर्शन

0

शिरपूर। राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलेली कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना मिळावा व सरकारने लागु केलेली अट म्हणजे कर्जमाफीसाठी भराव लागणारा ऑनलाईन फार्म शेतकर्‍यांना भरून देतांना मदत करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी सोडवता याव्यात व शेतकर्‍यांना याबाबत योग्य ते प्रोत्साहन व मार्गर्दशन व्हावे व त्यांना कर्जमाफी मिळणे सुकर व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले आहे. यानुसार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांचे ऑनलाईन फॉर्म भरुन घेतले.

ई सेवा केंद्रावर जाऊन भरुन घेतले फॉर्म
या सूचनांनुसार तालुक्यातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी आज मंगळवार 22 रोजी शिरपूर तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातील सेवाव्रत या ई सेवा केंद्रावर जाऊन शेतकर्‍यांना कर्जमाफीचे फॉर्म भरुन देण्यात व त्यांचे र्फाम सेवा केंद्रात लॉगींग करे पर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. स. 10 ते सां. 5 या वेळेत सेना पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना मदत केली. या वेळेस तालुका शिवसेनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कामात सेनेच्या तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत,उप प्रमुख हिमंत महाजन,उप जिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,उप तालुका प्रमुख मनोज धनगर,उप तालुका प्रमुख अभय भदाने,विभाग प्रमुख दिपक चेारमले,रविंद्र तंवर,पिंटू ठेलारी, प्रदिप पाटील प्रविण सोनवणे इ. कार्यकत्यांनी परिश्रम घेतले व शेतकर्‍यांना दिलासा देऊन मदतीचा हात दिला.