मुंबई । शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बसण्याच्या जागेवरून हा वाद झाला असून याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर खासदार गायकवाड यांनी आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमके काय झाले
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे एअर इंडियाच्या विमानाने पुण्यातून दिल्ली येथे जात होते. यावेळी बसण्याच्या जागेवरून एअर इंडियाचा कर्मचारी आणि खासदार गायकवाड यांच्यात वाद झाला. त्याचदरम्यान चिडलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचार्याला चपलेने मारले. गायकवाड यांनी आपण बिझनेस क्लासचं तिकिट खरेदी केले होते. पण जेव्हा विमानात गेलो तेव्हा मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचार्याला विचारला असता. त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्या अधिकार्याला मी शिवसेनेचा खासदार असल्याचे सांगितले. तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता. मला मोठमोठ्या आवाजात तो बोलत होता. त्याला विनवणी करूनही तो एकण्यास तयार नव्हता. मी पंतप्रधान मोदींशी बोलतो, असे म्हणत तो मला पकडायला आला. त्यावेळी मी त्याला पायातील सँडल काढून मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
ओवेसींना मारल्याचा दावा