शिवसेनेच्या नगरसेवकांना दिलासा

0

सुनिल माळी यांचा तक्रार अर्ज फेटाळला

जळगाव-मनपाच्या 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत खाविआच्या नगरसेवकांनी राजीनामा न देता पक्षांतर करुन शिवसेनेकडून निवडणूक लढविली.त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत भाजपचे सुनिल माळी यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.या अर्जावर सुनावणी झाली.दरम्यान,माळी यांनी दाखल केलेला अर्ज नियमाप्रमाणे अपात्रता घोषीत करण्यासाठी असलेले निकष पूर्ण करीत नसल्याने अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा,विष्णू भंगाळे,राखीताई सोनवणे,ज्योती तायडे,नितीन बरडे,सुनिल महाजन,जयश्री महाजन,शेख शबानाबी सादिक,जिजाबाई भापसे हे पूर्वी खाविआचे नगरसेवक होते. 2018 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत खाविआचा राजीनामा न देता शिवसेनेकडून निवडणूक लढविली.आणि ते निवडून आले.याप्रकरणी त्यांना अपात्र करण्याबाबत भाजपाचे सुनिल माळी यांनी दि.11 सप्टेंबर 2018 रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.या अर्जावर सुनावणी झाली.दरम्यान,माळी यांनी दाखल केलेला अर्ज नियमाप्रमाणे अपात्रता घोषीत करण्यासाठी असलेले निकष पूर्ण करीत नसल्याने अर्ज फेटाळण्यात आला आहे. याबाबतचे आदेश मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे.