मुंबई: अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेतील वाक्ययुद्धावरून संपूर्ण राज्यातील राजकारण तापले आहे. मुंबईबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल शिवसेनेने कंगना रानौतवर जोरदार टीका केली होती, त्यानंतर महापालिकेने कंगनाचे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत ते तोडले. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. कंगना रानौत यांच्या कार्यालयावर केलेली कारवाईही मनपाची जबाबदारी आहे. राज्य सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असे सांगत शिवसेनेच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला.
शिवसेनेच्या भूमिकेवर मी बोलणार नाही. कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई ही मनपाने घेतलेला निर्णय आहे, याच्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही असे शरद पवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यालयाने स्थगिती दिली आहे. मात्र हा अंतिम निर्णय नसून ते घटनापीठाकडे गेले आहे. कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे आहे असे शरद पवारांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.