शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी !

0

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच मोठा झाल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काल शिवेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. मात्र वेळेत राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या पाठींब्याचा पत्र मिळाले नसल्याने शिवेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आले नाही. शिवसेनेने राज्यपालांकडून वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी ती नाकारली आणि तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला निमंत्रित केले. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. पक्षपातीपणाचे आरोप करत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी १३ रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहे.