पाचोरा । येथील महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्ज माफी दिल्याची घोषणा केली असून या शेतकर्यांना कर्ज माफी केलेल्या परिपत्रकात नमूद केलेल्या अटी व शर्ती मान्य नसल्यामुळे शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या नेतूत्वाखाली शिवाजी चौकात परीपत्रकाची होळी करण्यात आली. माजी आमदार आर.ओ. पाटील, नगरअध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, अॅड. दिनकर देवरे, जि.प. सदस्य पद्मसिंग पाटील, दीपक राजपूत, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, गणेश पाटील, वाल्मीक पाटील, आनंद पगारे, सुधाकर महाजन, अशोक निबाळकर, पपु राजपूत, पपु महाजन, किशोर बरवरकर, बंडू चौधरी, संदीप पाटील, जितू पेंढारकर, रवींद्र पाटील, राजू पाटील, नाना वाघ, विजय भोई, दीपक पाटीलसह शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.