महागाई संदर्भात बेताल वक्तव्य करणारे भाजप मंत्री अल्फोन्स यांचा शिवसेनेतर्फे निषेध
अल्फोन्स यांच्या पुतळ्याला चपलाचा मार
धुळे । जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आली आहे. सत्ता संपादनासाठी जनतेला अनेक आश्वासने भाजपने दिले मात्र सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासन भाजप पाळत नसल्याचे उघड झाले आहे. सरकार कडून जनतेची अपेक्षा भंग झाली आहे. त्यातच भाजपच्या वाचाळवीर पदाधिकार्यांकडून उलट सुलट वक्तव्य केले जात आहे त्यामुळे नागरिकांच्या असंतोषात जास्तीचे भर पडत आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त असून भाजपचे मंत्री अल्फोन्स यांनी इंधनाचे दर वाढल्याने जनता उपाशी मरणार आहे का असे वक्तव्य केले आहे.
याचा शिवसेनेने निषेध करत अल्फोन्स यांना चप्पल मार आंदोलन केले. श्रीराम पेट्रोल पंप येथे पुतळ्यास चप्पल मार आंदोलन पार पडले.शहरातील ६ पेट्रोल पंपांवर जनजागृतीपर महागाईच्या संदर्भातले डिजीटल बॅनर लावण्यात आले.
जनतेमध्ये नाराजी
२०१४ मध्ये आघाडी शासन काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव प्रती बॅरल ११० रुपये होते. त्यावेळी भारतीय बाजारातील पेट्रोलचे भाव ७४ रुपये प्रति लिटर होते. त्यावेळेस ह्याच भाजपाच्या नेत्यांनी पेट्रोल डिझेलके भाव कम करो या तो कुर्सी खाली करो ! अशा प्रकारचा नारा देत अनेक आंदोलने केले होते तेच आज सत्तेत असतांना इंधनाचे भाव कमी करत नसल्याने जनतेमध्ये नाराजी पसरली आहे.
यांचा होता सहभाग
आंदोलनात जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले, अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, महेश मिस्तरी, भगवान करनकाळ, भुपेंद्र लहामगे, गंगाधर माळी, अॅड.पंकज गोरे, सुनिल बैसाणे, किरण जोंधळे, भगवान गवळी, देवा लोणारी, संदिप सुर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, मयुर कंड्रे, नगरसेवक प्रशांत श्रीखंडे, संदिप मुळीक, हरीष माळी, नरेंद्र अहिरे, आबा भडागे, दिनेश जाधव, राजेंद्र सोनवणे, संजय जगताप, रामदास कानकाटे, संजय जवराज, दिनेश पाटील, प्रमोद चौधरी, शशिकांत सुर्यवंशी, भिलेष खेडकर, संदिप सुर्यवंशी भरत, चौधरी, रवि माळी, मनोज शिंदे, भाऊसाहेब चौधरी आदींसह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले.
सत्तेत आल्यानंतर गप्प का
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाचे भाव फक्त ५० रुपये प्रति बॅरल आहेत तर बाजारपेठेत पेट्रोलचे भाव ८० रुपये प्रति लिटर पर्यंत जावून उच्चांक गाठलेला आहे. अशावेळी हेच भाजपाचे नेते गप्प का? असा प्रश्न सामान्य जनता विचारते आहे. महागाईने सामान्य जनतेचे कंबर मोडले आहे. इंधन हे सामान्य जनतेचे दैनंदीन गरज आहे. त्याचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य जनता होरपळुन गेलेली आहे. यावेळी सरकारच्या निषेर्धा घोषणा बाजी करण्यात आली. इंधन दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.