शिवसेनेतर्फे चौकशीसाठी निवेदन

0

धुळे । शिवसेनातर्फे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या वाहनाची कांच फोडून समाजकंटकांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्यामागील सूत्रधाराला जेरबंद करावे तसेच हिलाल अण्णा माळींना पोलिस संरक्षण मिळावे या मागणीसाठी 21 मार्च रोजी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिसप्रमुख चैतन्य एस यांची भेट घेवून निवेदन दिले. काहीही कारण नसतांना सामाजिक शांतता भंग करण्याच्या हेतून कुणीतरी अज्ञात समाजकंटकांनी वाहनाला टार्गेट केले. हा प्रकार निंदनीय आहे.

भविष्यात सामाजिक शांततेला कुठेतरी गालबोड लागू नये, जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना निःशुल्क पेालिस संरक्षण देण्यात यावे, तसेच वाहनाच्या काचा फोडणार्‍या आरोपीचा शोध घूवन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, सतीश महाले, डॉ. माधुरी बोरसे, भगवान करणमाळ, महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, गंगाधर माळी, संजय गुजराथी, भुपेंद्र शहा, शानाभाऊ सोनवणे, हिंमत महाजन, कैलास पाटील, छोटू पाटील, नितीन पाटील, पंकज मराठे, छोटूसिंग राजपूत, विश्‍वनाथ पाटील, मनिष जोशी, विशाल देसले, भगतसिंग राजपूत आदींंच्या स्वाक्षर्‍या आहेत.