भुसावळ : स्व.मीनाताई ठाकरे यांच्या 85 वा जयंतीदिन ममता दिन म्हणून शिवसेनेतर्फे साजरा करण्यात आला. शिवसैनिकांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना कार्यालयात शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ व उज्वला बागुल यांचे हस्ते प्रतिमेस मालार्पण करण्यात आले. यावेळी उमाकांत शर्मा, मिलिंद कापडे, सोनी ठाकूर, बबलू बर्हाटे, निखिल सपकाळे, गणेश सोनवणे, राहुल सोनटक्के आदी शिवसैनिकानी अभिवादन केले.
मान्यवरांचे मनोगत
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिमा पूजन केले. नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मातोश्री मीनाताईंमुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खूप मोठा आधार होता. मीनाताई म्हणजेच सर्व शिवसैनिकांच्या मातोश्री होत त्यामुळे त्यांची प्रेरणा सर्वांनी घेवून आपले आयुष्य शिवसेनेच्या उत्थानासाठी देण्याचे आवाहन केले.