शिवसेनेतर्फे महिला कर्मचार्‍यांचा सत्कार

0

साक्री । जागतिक महिला दिनानिमित्त साक्री तालुका शिवसेनेतर्फे ग्रामीण रूग्णालय व पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख भुपेश शहा, तालुका अध्यक्ष विशाल देसले, पंजाबराव गांगुर्डे, डॉ.श्रीकांत पाटील, आबा सोनवणे, डॉ. विशाखा खैरनार, डॉ. अनामिका सानप, डॉ. दिपाली देसले आदी उपस्थित होते. याप्रसंगी महिला कर्मचारी एस.एस. पाडवी, एस.पी. परदेशी, प्रज्ञा धिवरे, मृणालिनी विसपुते, अलका सुर्यवंशी, आरती अहिरे, मेघा खैरनार, रेखा नवसारे, वर्षा पटाईत यांचा शाल श्रीफळ देवून तालुका प्रमुख विशाल देसले, भुपेश शहा यांनी सत्कार केला

यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती
पोलीस महिला कर्मचारी वंदना निकुंभ, सोनाली हटकर, नेहा विभुते, हेमलता नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाखा देसले यांनी महिलांना सन्मानपुर्वक वागविल्यास कौटंबिक, व्यावसायिक ठिकाण तणाव निर्माण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. आबा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळा शिंदे यांनी तर आभार एस. पी. परदेशी यांनी मानले. शिवसेनेचे बाळा शिंदे, बंडू गिते, धनराज चौधरी, निलेश गायकवाड, नितीन गुप्ता, दिपक घुगे, साजीद तांबोळी, कांतीलाल गुरव, विक्की बाबर आदी उपस्थित होते.