शिवसेनेतर्फे राबविण्यात येणार भगवा सप्ताह

0

भुसावळ। शिवसेनेतर्फे 30 मे ते 5 जून पर्यत भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. कार्यकर्ते आणि शिवसेना यामधला ताळमेळ कायम ठेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून सरकार दरबारी त्याचा पाढा वाचण्यात येणार आहे. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, गारपीठ अशा विविध समस्या शेतकर्‍यांच्या आहे. यामुळे तालुक्यात आणि गावात जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेण्यात येणार आहे. शिवसेना व संलग्न सेना पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
यावेळी प्रा. धिरज पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका प्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, जिल्हा परिषद सदस्य सरला कोळी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, प्रा. धिरज पाटील, रेल कामगार सेनेचे ललीत मुथा, शिक्षक सेनेचे निळे, उप तालुका प्रमुख नितीन सोनवणे, महिला आघाडीच्या योगिता सोनार, विकास पाटील, देवेंद्र पाटील, निळू झोपे, नितीन देशमुख, हर्षल पाटील, सोनी ठाकुर, सुरेंद्र सोनवणे, निलेश ठाकुर, शुभम सोनार आदी उपस्थित होते. देवेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक मांडले. शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी आंदोलन करण्यात येऊन शेतकर्‍यांचा कर्ज पुरवठा, बँक खात्यातील अडचणी सोडविणे तसेच आंदोलन करुन निवेदन देणे, गाव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक यांचे नुतनीकरण करणे, तालुक्यातील शेतकरी आत्महत्त्या कुटूंबाचे सांत्वन करुन मदत व सहकार्य करणे, प्रत्येक शेतकर्‍यांना मासिक 3 हजार रुपये वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केले. दीपनगर केंद्राच्या 25 किलोमीटर पर्यंतच्या भागातील वाढते भारनियमन रद्द करावे, राखेमूळे परिसरात स्थानिक नागरिक व शेतकर्‍यांवर पिक यांच्यावर होणारे दुष्परिणाम याबाबतीत कारवाई करण्यासाठी दीपनगर केंद्रावर आंदोलन करणार असल्याचेे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले