शिवसेनेत जाणार ही केवळ अफवा: छगन भुजबळ

0

नाशिकः राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री सचिन अहिर आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकरणावर खुद्द छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेना प्रवेश करणार असल्याची केवळ अफवा असल्याचे सांगत त्यांनी वृत्ताचे खंडन केले आहे.

सचिन अहिर याच्यासंदर्भातील वृत्तही मी टीव्हीवर ऐकलेले आहे. माझे आणि सचिन अहिरचे काही बोलणे झालेले नाही, असा खुलासाही छगन भुजबळांनी केला आहे. आज येवल्यात भुजबळांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्प जलपूजन करण्यात येत आहे, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त पुतणे समीर भुजबळ यांनीही फेटाळून लावलं आहे. ते म्हणाले, आम्ही आता खूप पुढे निघून आलोय. मलाही मेसेज आला. तथ्यहीन आणि हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत.