मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांनी आज शपथ घेतली. दरम्यान शपथविधीवरून शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे संजय राऊत हेच या शपथविधीवर नाराज आहेत. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्री पदाची संधी दिले नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात असून त्यांनी शपथविधीला येणे टाळले आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. सुनील राऊत हे सध्या अज्ञातस्थळी आहेत. उद्या ३१ डिसेंबरलाच ते आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, अॅड.अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह 13 जण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.