शिवसेनेने चर्चेसाठी यावे, चर्चेशिवाय विषय मार्गी लागणार नाही: गिरीश महाजन

0

मुंबई: मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु आहे. निकाल लागून आठवडा उलटला आहे मात्र सरकार स्थापन झालेले नाही. युतीत तणाव निर्माण झाले आहे. दरम्यान आज भाजपने कोअर कमिटीची बैठक घेतली. यावेळी सत्ता स्थापन करणार असल्याचे भाजपने सांगितले आहे. यावर बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजप-सेनेने युतीत निवडणूक लढली असून निकालानंतर मात्र शिवसेना चर्चेसाठी तयार नाही. शिवसेनेने चर्चेसाठी यावे, चर्चा केल्याशिवाय सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लागणार नाही असे आवाहन शिवसेनेला केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन बोलत होते.

जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला असून या कौलानुसार सरकार स्थापन व्हायला हवे, मात्र शिवसेनेकडून चर्चेसाठी प्रस्ताव येत नसल्याने तणाव निर्माण झाला आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पाच वर्भाषासाठी भाजपचाच
निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत, राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होईल आणि तो पाच वर्षासाठी होईल असा पुनरुच्चार गिरीश महाजन यांनी केले.