शिवसेनेने शेतकर्‍यांकडून कर्जमुक्तीचे घेतले अर्ज भरुन

0

सोनगीर। येथील सूतगिरणीसमोरील शेतात शिवसेनेतर्फे शासनावर दबाव वाढविण्यासाठी कर्जमुक्तीसंदर्भात शेतकर्‍यांचे अर्ज भरून घेण्यात आले.शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी म्हणून विधानसभेत लढा दिल्यानंतर शिवसेनेकडून आता गावोगावी थेट शेतकर्‍यांना भेटून आंदोलनाची व्याप्ती व शासनावरील दबाव वाढविला जात आहे.

यासाठी 25 रोजी शेतकर्‍यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, नितीन पाटील, नरेंद्र अहिरे, महावीर जैन, उपसरपंच धनंजय कासार, , ग्रामपंचायत सदस्य पराग देशमुख, विशाल मोरे, संदीप गुजर आदी उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकर्‍यांचे अर्ज भरून घेतले शेतकरी कोणती पिके घेतात, कर्ज किती आदी प्रश्नांसह अन्य उत्पन्नाचे साधन, पीक विम्याचा लाभ आदी नोंदी अर्जात भरण्यात आल्या.