इंदापूर । शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देण्याची वल्गना करणारी शिवसेना आता सरकारबाहेर पडण्याऐवजी खांदेपालट का करते आहे? शेतकर्यांचा विश्वासघात करणार्या या घुमजावासाठी शिवसेनेला नेमका काय मलिदा मिळाला? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
संघर्षयात्रेच्या सहाव्या दिवशी आज पंढरपूर आणि इंदापूर येथील जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारवर जोरदार तोफ डागली. शिवसेनेवर हल्लाबोल करताना विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेने आजवर शिवरायांच्या नावावर राजकारण केले. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज शिवरायांना खरी आदरांजली वाहण्यासाठी सरकारमधून बाहेर पडावे आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केले. दरम्यान संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांनी आज सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला सुबुद्धी घालण्याचे साकडे घातले. पाटीलत्रिमंडळातून बाहेर पडावे