शिवसेनेमध्ये गटप्रमुख हाच स्टार प्रचारक : श्रीरंग बारणे

0

पिंपरी-चिंचवड : शिवसेनेमध्ये गटप्रमुखांना घटनात्मक दर्जा दिला असल्यामुळे गटप्रमुख हा आपल्या पक्षाचा पाया आहे. गटप्रमुखांची कार्यपद्धती याबाबत सर्व गटप्रमुखांना मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली आहे. त्यानुसार गटप्रमुखांनी दैनंदिन नियोजन करावे. व विभागप्रमुख यांनी दर आठवड्यातून एकदा आढावा घ्यावा, असे आवाहन खा.श्रीरंग बारणे यांनी केले. व गटप्रमुख हाच पक्षाचा स्टार प्रचारक असल्याचे सांगितले.

गटप्रमुखांचा मार्गदर्शन मेळाव
शिवसेनेच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गटप्रमुखांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे तसेच मावळचे संपर्कप्रमुख गणेश जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

गटप्रमुख हाच मोठा दुवा
आगामी लोकसभेसाठी सर्व पदाधिकार्‍यांनी कामी लागण्याचे आदेश संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांनी दिले. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी आगामी काळात गटप्रमुख हाच मतदार व उमेदवार यांच्यामधील महत्वाचा दुवा असल्यामुळे शाखानिहाय, विभागनिहाय आढावा बैठक घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मावळ संपर्कप्रमुख गणेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका प्रमुख राजू खांडभोर यांच्यातर्फे गटप्रमुखांकरिता मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपसथिती
या कार्यक्रमास महिला आघाडीप्रमुख शादान चौधरी, तालुका संघटिका शैलाताई खंडागळे, उपतालुकाप्रमुख यशवंत तुरे, मदन शेडगे, समन्वयक बाळासाहेब फाटक, वाहतूक सेना सहायक महेश केदारी, तालुका संघटक सुरेश गायकवाड तसेच शहरप्रमुख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते व विभागप्रमुख राम सावंत यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले, तर तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विदिश मुथ्था यांनी आभार मानले.