शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ; तर सत्तेसाठी भाजप राष्ट्रवादीसोबत

0

मुंबई: ग्रामीण भागात वर्चस्व मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याने, मंगळवारी राज्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करून सत्ता काबीज केली. ग्रामीण सत्तेच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण उदयास आले. त्यामुळे याचे पडसात राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसह दहा महापालिकेच्या निवडणूक पार पडल्या त्यात भाजपला चांगलं यश संपादन केलं. उत्तरप्रदेश निवडणुकीतही भाजपला निर्विवाद यश मिळालं आहे. राज्यात भाजपची सत्ता असून शिवसेना ही त्यात सहभागी आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना दुय्यम स्थान मिळत असल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष अनेकवेळा चव्हाट्यावर आला. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात शिवसेना आणि भाजपमधील दारी आणखीनच वाढली आहे. यापुढील निवडणुकीत भाजपशी युती न करण्याची घोषणा हि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळवले असले तरी ग्रामीण सत्तेत भाजपला रोखण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे त्यानुसारच पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपला बाजूला सारीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून भाजपला सत्तेपासून लांब ठेवले आहे.

जुन्नर पंचायत समिती निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. त्यामुळं सभापतीपदी ललिता चव्हाण (शिवसेना) आणि उपसभापती उदय भोपे (काँग्रेस) यांची निवड झाली आहे. खेड पंचायत समितीत ही शिवसेना काँग्रेस युती झाली असून, सभापतिपदी शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे तर उपसभापती काँग्रेसचे अमोल पवार निवडून आले आहेत. जालना पंचायत समितीत शिवसेना काँग्रेस युती झाल्याने सभापतिपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापतीपदी काँग्रेस पुरस्कृत द्वारकाबाई खरात निवडून आले आहेत. पलूस पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीची युती झाल्याने सभापतिपदी भाजपच्या सीमा मागलेकर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण पवार निवडून आले. चांदवड पंचायत समिती सभापतिपदी भाजपचे डॉ नितीन गांगुर्डे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अमोल भालेराव बिनविरोध निवड झाली. तर देवळा पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसरबाई अहिरे तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या सरला जाधव बिनविरोध निवड झाली आहे. चिपळूण पंचायत समितीतही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आली असून सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा निकम, उपसभापतीपदी शिवसेनेचे शरद शिगवण निवडून आल्या आहेत.

पंकजा मुंडेंना धक्का
पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदार संघातील परळी आणि आंबेजोगाई या दोन्ही पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे त्यामुळे हा पंकजा मुंडे याना धक्का समजला जात आहे. परळी तालुका पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्पना साळुंखे तर उपसभापतीपदी बालाजी मुंडे यांची निवड झाली आहे. आंबेजोगाई पंचायत समितीच्या सभापतिपदी मीना भताने तर उपसभापतीपदी तानाजी देशमुख यांची निवड झाली आहे.

भाजपही राष्ट्रवादी बरोबर
पलूस आणि चांदवड पंचायत समिती भज आणि राष्ट्रवादी युती झाली आहे. पलूस पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीची युती झाल्याने सभापतिपदी भाजपच्या सीमा मागलेकर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण पवार निवडून आले. चांदवड पंचायत समिती सभापतिपदी भाजपचे डॉ नितीन गांगुर्डे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अमोल भालेराव बिनविरोध निवड झाली.

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला
भिवंडी तालुका कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे अनंता दुदाराम पाटील तर उपसभापती पदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनंता भागोजी पाटील याची निवड करण्यात आली त्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष केला भाजपचे दयानंद दुधाराम पाटील याना या निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप गटात शांतता पसरली होती. गेल्या महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकी झाली होती या निवडणुकीत शिवसेना महायुतीला 11 तर भाजपाला 7 असे जागां मिळाल्या होत्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकावण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी केली होती तर भाजपने सुद्दा युहरचना केली होती त्यामुळे आज सभापती व उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.