शिवसेनेला जबर धक्का: माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

0

नाशिक: शिवसेनेला नाशिकमध्ये जबर धक्का बसला आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेत नाराज होते.

महाविकास आघाडीतील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच त्यांचा भाजपात प्रवेश होईल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.