मुंबई: विधानसभा निवडणुकीत शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेकडे सध्या अपक्षांनी पाठींबा दिल्याने ६३ आमदारांची सख्या जमली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसैनिक आक्रमक झाले असल्याने अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दररोज दोन्ही पक्षांकडून नवनवीन वक्तव्य समोर येत आहे. भाजप शिवसेनाला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही. यावरच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नवीन वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याचे भाजपचे म्हणणे असेल तर भाजपलाही मुख्यमंत्री पद कसे मिळणार आहे असे सांगत पुन्हा आक्रमक भूमिका मांडली.
आज शिवसेनेच्या नवनियुक्त आमदार आणि पक्षनेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री पदासह मंत्री पदाचे समसमान वाटप व्हावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अद्याप देखील दोन्ही पक्षाकडून प्रयत्न झालेले नाही.