मुंबई: विधानसभा निवडणूक झाली असून अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. भाजप-सेनेची युती झाली असताना मुख्यमंत्री कोण होणार यावर सत्ता स्थापनेचा घोडा अडून पडला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही असे मला वाटते असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. शिवसेनेपेक्षा भाजपची जागा अधिक असून साहजिकच भाजपचा मुख्यमंत्री होईल असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
आज भाजपच्या पक्षनेत्याची निवड होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच पक्षनेतेपदी निवड होणार आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. भगवे फेटे परिधान करून भाजपचे नवनिर्वाचित आमदार विधानभवन परिसरात उपस्थित होते. भाजपची पक्षनेते पदाच्या निवडीची बैठक सुरु आहे.