शिवसेनेला युती करायची नसेल तर भाजप स्वबळावर लढेल!

0

सुधीर मुनगंटीवार
मुंबई :- शिवसेना-भाजप युतीबाबत कोणत्याही पक्षावर दबाव नाही. भाजप हा कायम युती करण्यासाठी प्रयत्नशील राहील. मात्र जर शिवसेनेला युती करायची नसेल तर भाजप स्वबळावर विधानसभेच्या २८८ जागा लढवेल आणि सत्तेवर येईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात भेट ठरली होती का असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रालयात पत्रकारांनी विचारला असता अशी कोणतीही भेट ठरली नसल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी केले. भाजप जोडणारा पक्ष आहे. त्यामुळे युतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र युतीही भाजपची मजबुतरी नाही, शिवसेनेला वेगळं लढायचं असेल तर भाजपही स्वबळावर निवडणुका लढेल. शेवटी युती ही भावनेवर होत नाही तर तर्कावर आणि आकडेवारीवर होते. त्यामुळे युती झाली तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीनेच होईल. मात्र तुर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर नाणार प्रकल्प गुजरातला आंदण द्यायचा का?
नाणार प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाणार प्रकल्प महाराष्ट्रात व्हायचा नेसल तर ता गुजरातला आंदण द्यायचा का? १ लाखांपर्यंत रोजगार निर्माण करणार्‍या या प्रकल्पाचे स्वागतच गुजरातकडून केले जाईल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नेमके काय आणि कितपत नुकसान होणार हेदेखील समजून घेण्याची गरज असून केवळ विरोधाला विरोध नसावा, असे त्यांनी सांगितले.