मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी २१ रोजी राज्यात एकाचवेळी मतदान झाले. उद्या निकाल लागणार आहे. निकालापूर्वीच अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखविले आहे. यात महायुतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला या निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांनी शिवसेनेशिवाय भाजप सत्तेत राहू शकत नसल्याचे विधान केले आहे. शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते.
उद्या निकाल लागल्यानंतर शिवसेना काय आहे? हे सगळ्यांना कळेल असे देखील त्यांनी सांगितले आहे.