शिवसेनेशी घरोबा करायला काँग्रेस तयार

0

नांदेड । जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसे स्पष्ट संकेत दिले.

अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजपने चांगले यश मिळवले, मात्र सत्तास्थापनेच्या गणितात त्यांना शिवसेना किंवा इतर पक्षांची मदत लागणार आहे. काँग्रेसने अशा ठिकाणी शिवसेनेला साथ देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली आहे. ज्या ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल अशा ठिकाणी काँग्रेस शिवसेनेला मदत करण्यासाठी तयार झाली आहे. आता शिवसेना यावर काय प्रतिसाद देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एवढंच नाहीतर औरंगाबाद जिल्ह्यात नगर पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि सेनेने युती केली. सेना आणि काँग्रेसने जिल्ह्यातील आठपैकी पाच समिती ताब्यात घेतल्या आहेत.