2014 ला लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाचे वर्तनच बदलले. केवळ नेत्यांकडे असणारा अहं भाव साध्या कार्यकर्त्यांपर्यंत झिरपला. सगळीकडेच ताठरता. सरकार स्थापनेनंतर घटक पक्षांना काडीचीही किंमत उरली नाही. स्वातंत्र्यपूर्व चळवळीत ब्रिटिशांविरोधात चले जावो जसा नारा होता, त्याचपद्धतीने इतर पक्षांना अशी धमकावणी सुरू झाली. महाराष्ट्रात मात्र शिवसेना पुरून उरली. सत्तेत राहून भाजपलाच खुर्ची खाली करण्याची भूमिका घेतली. सुरूवातीला भाजपने ताठरपणा दाखविला-तुमची आम्हाला गरज नाही. सरकार कोसळणार नाही. अशी दर्पोक्ती त्यांनी दाखविली. मात्र, अधून मधून रुती टिकावी ह्या एकमेव अपेक्षेने राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीला भेट देत असतात…आता 2019ची चाहुल लागताच, शिवसेना-भाजप हे स्वतंत्रपणे लढले तर त्राचा फटका दोन्ही पक्षांना बसेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलून गेले आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत भाजपची प्रतिमा मवाळ अशी होती. मात्र, निकाल लागले आणि जादू झाल्याप्रमाणे प्रत्येकाच्या अंगी टोकाची आक्रमकता आली. देहबोलीपासून सर्वांचे वर्तन कमालीचे बदलले. हिंदू वगळता इतरांशी जन्मोजन्मीचे वैर असल्यासारखे वर्तन सुरू झाले. देशातील विविध राज्यात त्या त्या ठिकाणी साथ दिलेल्या पक्षांबरोबरही त्यांची हीच भूमिका राहिली. महाराष्ट्रात मात्र शिवसेना त्यांना पुरून उरली. सुरूवातीला त्यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न भाजपने केला; पण स्वत:च घायाळ होण्याचे प्रसंग ओढविले.
शिवसेनेने अशी एकही सभा, बैठक किंवा मुखपत्र सामनातील अग्रलेख सोडला नाही की भाजपला व त्यांच्या नेत्यांना सुळावर चढविले नाही. पहिले वर्ष सोडले, तर बाकीचे साडेतीन महिने कायम धारेवर धरले. देशात प्रचंड ताकदीनिशी वर आलेला हा पक्ष महाराष्ट्रात मात्र मलूल राहिला. कारण जर आपण शिवसेनेची साथ सोडली, तर स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता कधीच येवू शकत नाही हे भयंकर वास्तव त्यांना माहित आहे. आता गेल्या साडेचार वर्षात महाराष्ट्रातील राजकीर परिस्थिती पूर्ण बदलली आहे.
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रालोआने 42 जागी विजय मिळवला होता. त्रात 18 शिवसेनेच्या आहेत. रालोओत तेव्हा खासदार राजू शेट्टी रांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही होती. मोदींनी तेव्हा शेट्टींसाठी जाहीर सभाही घेतली होती. आता शेट्टी आघाडीच्रा बाहेर आहेत. तिकडे शिवसेना आघाडीत तर आहे, परंतु 2019 ची लोकसभा स्वतंत्र लढण्राचा पवित्रा आहे. खरे तर आघाडी तोडल्याचा फटका भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही बसू शकतो. युती संबंधीच्या निर्णयाचा थेट परिणाम विदर्भातील 10 पैकी 8, मराठवाड्यातील 8 पैकी 4, पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी 9 आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांवर होऊ शकतो. आघाडी झाली नाहीतर दोन्ही पक्षांचा संरुक्त जागांच्रा संख्रेत 41 वरून 25 अशी घट होऊ शकते. अर्थात एकूण 16 जागांवर थेट परिणाम होईल. त्याचा फारदा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला होईल. दुसरीकडे आघाडी केली जाणार नाही, असा पवित्रा शिवसेनेेने घेतला आहे. विदर्भ हा भाजप-सेनेचा गड आहे.
सध्या विदर्भात भाजपचे 6 व शिवसेनेचे 4 खासदार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे क्षेत्र आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजप बळकट झाले. सेेनेचा विरोध आहे. रवतमाळ-वाशीम सेनेचे गड आहेत. नागपूर गडकरींचा पक्का मतदारसंघ आहे. मराठवाड्यामध्ये भाजप कमकुवत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच मतदारसंघातील आहेत. लातूर हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा गड आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप मजबूत झाला होता. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पक्ष कमकुवत झाला आहे.
युती न झाल्रास भाजपची वाटचाल कठीण आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मोदी लाटेतही शरद पवारांचा प्रभाव असलेले क्षेत्र. उर्वरित महाराष्ट्राच्रा तुलनेत जास्त समृद्ध. 2014 मध्रे मोदी लाट असतानाही 10 पैकी 4 जागी राष्ट्रवादीला मिळाल्रा होत्रा. भाजप-सेना आता मजबूत झाले आहेत. आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीला फारदा होईल. उत्तर महाराष्ट्र हा माजी मंत्री एकनाथ खडसे रांचे प्रभाव क्षेत्र. परंतु पक्षावर नाराज असल्राने भाजपचे नुकसान होऊ शकते. धुळ्राचे डॉ. सुभाष भामरे रांचे क्षेत्र आहे. परंतु पकड मजबूत नाही. छगन भुजबळांमुळे नाशिकमध्रे राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे. शिवसेनाही मजबूत आहे. काँग्रेसचे अस्तित्व नाही.
विदर्भ, मुंबई-कोकण व उत्तर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेचा जास्त प्रभाव राहिला आहे. राज्रातील 65 टक्के क्षेत्रफळ रा प्रदेशात रेते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रावर प्रभाव आहे. राष्ट्रवादीला चार जागी विजर मिळाला होता. काँग्रेसला मराठवाड्यात केवळ दोन जागी रश मिळाले होते. या सार्या पार्श्वभूमीवर सेनेने साथ सोडणे, भाजपला परवडण्यासारखे नाही. त्याचमुळे शिवसेनेने कितीही कडवट प्रतिक्रिया दिली, तरी सौम्यपणाने घेण्याचे धोरण त्यांनी घेतलेले आहे. यातूनच आगामी 2019च्रा लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप हे स्वतंत्रपणे लढले तर त्राचा फटका दोन्ही पक्षांना बसेल.
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फारदा होईल, असे मुख्रमंत्री देवेंद्र फडणवीस रांनी सोमवारी स्पष्ट केले. सध्राच्रा राजकीर परिस्थितीत शिवसेना-भाजप वेगळे लढलो तर शिवसेनेला जास्त फटका बसेल, भाजपच्राही चार-पाच जागा इकडे तिकडे होतील, असेही सौम्य विधान त्यांनी केले. यातूनच असे दिसते आहे, की मंत्रीपद, विधानपरिषद, महामंडळ याठिकाणी वारंवार अडवणूक करणार्या भाजपचे वर्तन निवडणुकीपुरते का होईना बदलले आहे. शिवसेनेलाही आपल्या मर्यादित ताकदीचा अंदाज आहे. तरीही आजवर भाजपकडून मिळालेल्या वर्तणूकीचा वचपा ते काढत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे पाच महिने उरलेले असल्याने आता दोन्ही पक्ष सावध भूमिका घेत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचे मंत्री आणि खासदारांची बैठक घेतली, त्रातही लोकसभेला भाजपसोबत रुती करण्रास पक्षाच्रा खासदारांनी मूक संमती दिली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत देशपातळीवर शिवसेना-भाजपची रुती टिकविणे गरजेचे आहे. ’शिवसेना आमचा जुना मित्र आहे. आमची विचारधाराही सारखी आहे. त्रामुळे ही रुती झाली तर राज्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आम्हाला पराभूत करू शकणार नाही. राजकारण आणि राजकीर परिस्थिती बदलली की त्रानुसार निर्णर घ्रावे लागतात. आमच्या बाबतीतही तेच होईल’, असे सूचक वक्तव्यही सोमवारी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
याचा अर्थ असा आहे की, भाजपा आता स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवू शकत नाही आणि दुखावलेल्रा मित्रपक्षांच्रा विनवण्रा केल्राशिवार पर्रार नाही. सर्व विरोधक एकत्र आले की भाजपला पराभूत करता येते , हे दोन पोटनिवडणुका आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकींनी दाखवून दिल्रानंतर भाजपला मित्रपक्षांची आठवण होणे होते. एकानंतर एक चाली खेळत शिवसेना सातत्राने रुतीच्रा प्रस्तावाला झिडकारत असतानाही, भाजपचे सेनेसोबतचे ‘मनधरणी तंत्र’ सुरूच आहे.