शिवसैनिकांकडून नगरपालिका रुग्णालयास औषधांचा पुरवठा

0

भुसावळ । शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शहर शिवसेनेकडून विविध समाजिक उपक्रम राबवण्यात आले. पालिका रुग्णालयात 500 मिलीच्या 3 सलाईन बॉक्स आणि 2 नीडल्स इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. गरोदर महिलांसाठी या औषधांचा वापर होणार आहे. यासह शिवसैनिकांनी रुग्णांची विचारपूस करुन वर्धापनदिन साजरा केला.

गरोदर महिलांसाठी होणार वापर
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचेपूजन माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. जगदीश कापडे यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका रुग्णालयात सध्या औषधांची कमतरता असल्याने शिवसैनिकांनी वर्धापनदिनी 500 मिलीच्या 100 सलाईन, प्रसुतीसाठी लागणारे 200 इंजेक्शन नीडल्स, अत्यावश्यक असलेल्या 300 टॅब्लेटचा पुरवठा केला. पालिकेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांच्याकडे हा औषधसाठा सोपवण्यात आला आहे. पालिका रुग्णालयातून गरोदर महिलांसाठी या औषधांचा वापर करता येणार आहे.

यांची होती उपस्थिती
पालिका रुग्णालयात आवश्यक असलेल्या औषधांची माहिती घेवून गरजेच्या असलेल्या औषधांचा पुरवठा झाल्याने आता पालिका रुग्णालयातून होणार्‍या उपचारांसाठीही मदत होणार आहे. यावेळी शहरप्रमुख, नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. शाम श्रीगोंदेकर, युवासेना शहर अधिकारी मिलींद कापडे, उमाकांत (नमा) शर्मा, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जाधव, शिवाजी दाभट, निखिल सपकाळे, सुरज पाटील, सोनी ठाकूर, राहूल जैन, धीरज वर्ढोणकर, राजेश ठाकूर, गणेश काळे, किशोर शिंदे, शुभम पचेरवाल, बंडू चौधरी आदी उपस्थित होते.