शिवसैनिकांना शोधून शिवसेनेतर्फ हद्यसत्कार

0

नवापूर । शहरात शिवसेना स्थापनेनंतर काळानुसार अनेक शिवसैनिक निर्माण झाले काही अजुन ही आहेत तर काही शिवसेना सोडून गेले अशा जुन्या जाणत्या शिवसैनिकांना शोधून त्यांना आमंत्रित करून त्यांचा हद्यसत्कार शिवसेनेतर्फ करण्यात आला. यावेळी अनेक जुने शिवसैनिक एकञ आल्याचे पाहून सर्वाना आनंद झाला होता.शिवसेनेचे वर्धापनदिना निमित्त जुन्या शिवसैनिकांचा झालेला सत्कार सन्मान पाहून आम्ही तुम्हाला विसरलेलो नाहीत हे शिवसेनेने या स्तुत्य व स्मरनिय उपक्रम कार्यक्रमातुन दाखवुन दिले. नवापूर शिवसेनेतर्फे 51 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री राममंदीर येथे नवापूरच्या पंचक्रोशितील सर्व जूने शिवसैनिक यांना आमंत्रीत करून संत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक विजय (गोटू) पाटील, शंकर दर्जी, आंबादास आतारकर, राजू जोहरी, सलीम मंन्सूरी, विजय सैन, शिवदास देसाई, प्रमोद चांदेकर, प्रकाश चौधरी या जुन्या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते आर्वजुन उपस्थीत होते.

यावेळी जुन्या आठवणींना उजाळा
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमूख हसमूख पाटील,तालूका प्रमूख गणेश वडनेरे, उपपालीका प्रमूख राजेश जैस्वाल,शहर प्रमूख गोविंद मोरे, उपशहर प्रमूख प्रविण ब्रंम्हे, आनिल वारूडे, दर्पण पाटील, वाहतूकसेनेचे आनिल पाटील, यूवासेना शहर प्रमूख राहूल टीभे, गणेश पाटील, नामदेव पाटील, मदन पाटील, सूनिल पाटील, दर्शन पाटील, परेश चांदेकर ,शरद नेरे जितेद्र आहीरे यासह असंख्य शिवसैनिक यूवासैनिक उपस्थीत होते. जुने शिवसैनिक एकञ आल्यावर जुन्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. पुर्वी शिवसेनेत केलेले कार्य चांगले वाईट प्रसंग, आंदोलने, विविध कार्यक्रम, जुने जेष्ठ शिवसैनिक यांच्या भेटी, मातोश्रीवर, मेळाव्यातील त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्या आठवणीने सर्व शिवसैनिक स्तब्धपणे ऐकत होते. शिवसेना आम्हाला आज ही विसरली नाही. आमचा सत्कार सन्मान झाला हे उपस्थित जुन्या शिवसैनिकांचा चेहर्यावर आनंद देऊन गेला.